आम्हा सर्वांची नार्को टेस्ट करा-कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी

श्रीनगर: कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आम्हा सर्वांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मुख्य आरोपी सांझीरामने न्यायालयात केली. तसेच आम्हाला आरोपपत्र मिळाले नसल्याचेही आरोपींनी म्हटले आहे. न्यायालयाने मग आरोपींच्या वकिलांना आरोपपत्र देण्याचे आदेश पोलिसांना दिले.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, आरोपींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत, नार्को टेस्टमध्ये सर्व काही सिद्ध होईल, असा दावा केला.

दुसरीकडे पीडितेच्या वकिलांना वारंवार धमकावण्यात येतंय. त्यामुळे हे  प्रकरण जम्मू काश्मीर राज्याबाहेरच्या न्यायालयात चालवण्यात यावं अशी याचिका पीडित कुटुंबियांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्याचप्रमाणे पीडित कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली. याप्रकरणी पुढची सुनावणी 28 एप्रिलला आहे.

कठुआ गँगरेप आणि हत्येप्रकरणाला हिंदू-मुस्लिम वादाची किनार आहे. त्यामुळे हा वाद टाळण्यासाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती सरकारने सरकारी वकील म्हणून दोन शीख वकिलांची नियुक्ती केली आहे. हे वकील कोर्टात पोलिसांची बाजू मांडतील. या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. सांझीरामच्या मुलीनेही हे षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे.

“पीडित मुलगी ही हिंदू-मुस्लिम नव्हती. तिच्यावर बलात्कार झालेला नाही, तर तिची हत्या झाली आहे. त्याचा तपास सीबीआयने करावा, अन्यथा याप्रकरणात निर्दोष लोक अडकतील”, असा दावा सांझीरामच्या मुलीने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)