आम्हाला भाजपसारखी काळ्या कपड्याची भीती वाटत नाही – पायलट

जयपुर – कॉंग्रेसच्या रॅली मध्ये लोकांनी काळ्या टोप्या किंवा काळे कपडे घालून येण्यास आमचा विरोध नाही. कारण आम्हाला भाजप सारखी त्यांच्या काळ्या कपड्यांची भीती वाटत नाही असे प्रतिपादन राजस्थान प्रदेश भाजपचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी केले आहे. 7 जुलै रोजी राजस्थानात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत लोकांना काळे कपडे घालूून येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर सचिन पायलट यांनी हा टोमणा मारला आहे. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कोणत्याही रंगातले कपडे घालून येणाऱ्या लोकांचे आम्ही कॉंग्रेसच्या रॅलित स्वागत करू.

शेतकरी किंवा या राज्यातील नागरीक आपल्या विरोधात निदर्शने करतील म्हणून पंतप्रधान मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी लोकांना त्यांच्या सभांना काळे कपडे घालून येण्यास मज्जाव केला होता. पण आम्हाला लोकांच्या निदर्शनांची भीती वाटत नसल्याने आम्ही कोणत्याही रंगाच्या कपड्यांना विरोध करणार नाही असे त्यांनी नमूद केले.

-Ads-

राहुल गांधी यांची प्रचार सभा होती त्यावेळी भाजप सारखा आपणही काळे कपडे घालून येण्यास विरोध करणार काय असा प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारला होता त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)