आम्हाला गबाळे म्हणणाऱ्यांनी तालुका भकास केला – नीलेश लंके

मेळाव्यात पक्षाचा झेंडा हाती घेण्याचे दिले स्पष्ट संकेत

पारनेर – आपले जहाज भरलेले आहे ते कुठे भरकटू नये याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. त्याकरीता जहाजाला एखादा झेंडा लावावा लागेल. तालुक्‍यात शैक्षणिक संकुल उभारले नाही की, एखादा मोठा प्रकल्प आणला नाही आणि विकास केला असे म्हणतात असाही सवाल लंके यांनी केला. तसेच तालुक्‍याची अवस्था भकास झाली असून, आम्हाला गबाळे म्हणणाऱ्यांनीच तालुका भकास केला असल्याची टीका लंके यांनी ना. औटी यांचे नाव न घेता केली. हे तुम्हाला मान्य आहे ना असा सवाल करीत, पुन्हा विचारले नाही असे म्हणाल, असे सांगत निलेश लंके यांनी पक्षीय झेंडा हाती घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत कामोठे येथे दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविवारी मुंबईस्थीत पारनेकरांचा मेळावा नवी मुंबईमधील कामोठे येथे पार पडला. यावेळी लंके बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, मुंबई अध्यक्ष सुरेश धुरपते, सुदाम पवार, सचिव नितीन चिकणे, दादा शिंदे, ऍड. राहुल झावरे, कार्याध्यक्ष गोरक्ष आहेर, मुंबई संपर्क प्रमुख भाऊ पावडे, योगेश पवार, मार्गदर्शक राजेंद्र चौधरी, संभाजी रोहकले, युवा प्रमुख विजय औटी, दिनेश घोलप, प्रसारमाध्यम प्रमुख श्रीकांत चौरे, प्रवीण साबळे, अरुण पवार, रवींद्र राजदेव, संदीप चौधरी, संतोष ढवळे, संदीप सालके, अनिल चौधरी, जितेश सरडेसह हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे निलेश लंके प्रतिष्ठानचे राज्याचे सर्व पदाधिकारी, सदस्य माता भगिणी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबईसह पारनेर तालुक्‍यातील जनतेने उस्फूर्त गर्दी केली होती.

पारनेर-नगर मतदार संघातील सामाजिक व्यक्तीमत्व, आपल्या समाजाभिमुख कार्याचा ठसा जनमानसाच्या मनामनात उमटविणारे पारनेर निलेश लंके आयुष्याचा संघर्षमय प्रवास करीत असताना 24 तास 365 दिवस जनतेची निस्वार्थ जनसेवा करीत जमलेली मोठी गर्दी कामोठे (मुंबई) शहरात पाहावयास मिळाली. बाळासाहेबांच्या निष्ठावंत सैनिकाला पक्षातून काढल्यानंतर घेतलेल्या या मुंबईतील मेळाव्यातून लोकांनी केलेल्या गर्दीतून अनेकांना दखल घेण्यास भाग पाडले.
कुठली ही गाडी भाडयाने न लावता कुठल्याही गाडीला डिझेल न टाकता. पारनेर तालुक्‍यातून किमान 200 ते 250 चारचाकी गाड्यांचा ताफ्यासह कामोठे (मुंबई) च्या सिडको मैदानात किमान 15 हजार लंके समर्थकांचा जनसागर लोटला. त्यात महिलांची उच्च त्यांना आपलेसे करण्यास निलेश लंके यांनी बऱ्याच अंशी यश मिळवले आहे.

लंके यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या वाहतूक संघटनेस प्रारंभही यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर हळदी कुंकु समारंभही पार पडला. उपस्थितांनी पारनेरचे ना. विजय औटी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. तो धागा पकडीत निलेश लंके यांनी माझ्यासारखा एका शिक्षकाचा मुलगा राजकारणात येतोय म्हणून सर्व पुढारी विरोध करतात. आम्ही काय कायम तुमच्या सतरंजाच उचलायच्या का असा सवालही केला. पारनेर तालुक्‍यात एक रस्ताही धड नाही अशी टिका त्यांनी केली. आम्हाला गबाळे असे ते संबधोतात मात्र आमचे विचार चांगले आहेत, याची जाणीव समोरच्यांनी ठेवावी असेही ते म्हणाले की, 2019 ची विधानसभा आपण जिंकूच पण त्यानंतर मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेत पारनेरचे मुळ रहिवाशी नगरसेवक निवडून आणणारच अशी ग्वाही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)