आम्रपाली समूहाच्या तीन संचालकांच्या अटकेचे आदेश 

नवी दिल्ली: आम्रपाली या रिअल इस्टेट कंपनीच्या तिघा संचालकांना अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. लेखा परीक्षकांना कागदपत्रे सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी न केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. आम्रपाली समूहाचे संचालक अनिल कुमार शर्मा, शिव प्रिया आणि अजय कुमार यांनी यांनी कंपनीची कागदपत्रे फॉरेन्सिक ऑडिटर्सना उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी न करून केवळ लपाछपीचा खेळ खेळला जात आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आणि या संचालकांना अटक करण्याचे आदेश दिले. 

कंपनीच्या संचालकांकडे असलेल्या अनिश्‍चित मालमत्तेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या महिन्याभरापासून सुनावणी सुरू आहे. आम्रपाली कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दिल्ली, नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या पोलिसांनी परस्परांना सहकार्य करून तिन्ही संचालकांना ताब्यात घ्यावे आणि सर्व कागदपत्रेही ताब्यात घ्यावीत. ही कागदपत्रे नंतर फॉरेन्सिक ऑडिटिंगसाठी पाठवून देण्यात यावीत, असे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. 

-Ads-

आम्रपाली समूहाकडून 42 हजार ग्राहकांना खरेदी केलेल्या फ्लॅटचा ताबा मिळू शकलेला नाही. हे फ्लॅट वेळेवर मिळू न शकल्याने सर्व ग्राहकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेंव्हापासून आम्रपाली समूहाच्याविरोधात प्रकरण सुरू आहे. 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)