आम्रपाली समुहाची बॅंक खाती, मालमत्ता जप्त करा

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली – दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली आम्रपाली समूहाची बॅंक खाती आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गृहरचना प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा या समूहाकडून करण्यात आला होता. त्यामुळे आम्रपाली समूहाच्या सर्व 40 कंपन्यांची बॅंक खाती आणि स्थावर मालमत्ता तसेच सर्व संचालकांची वैयक्तिक मालमत्ताही जप्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा आणि न्या. यु.यु. ललित यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुंतवणूकदारांचे 2, 765 कोटी रुपये बांधकाम प्रकल्पांसाठी न वापरता अन्यत्र वळवण्यात आल्याच्या आरोपाची दखल घेऊन न्यायालयाने आम्रपाली समूहाकडून विश्‍वासघाताचा गुन्हा घडल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि एनबीसीसीच्या संचालकांना उद्या न्यायालयामध्ये उपस्थित राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आले आहे. आम्रपाली गृहनिर्माण कंपनी समूहाच्या अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांबाबत काय कारवाई केली, याची माहिती न्यायालयाने मागवली आहे. आम्रपाली समूहाचे लेखापरिक्षण करणाऱ्या सर्व चार्टर्ड अकाउंटंटची नावेही न्यायालयाने मागवली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)