आम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत 

लंडन (ब्रिटन): आम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संस्थेने म्यानमारच्या नेत्या, नोबेल शांती पुरस्कार सन्मानित आँग सान स्यु की यांना दिलेला सर्वोच्च नागरी सन्मान परत घेत असल्याचे जाहीर केले आहे. म्यान्मारच्या लष्कराने रोंहिंग्या मुस्लिमांविरोधात चालवलेल्या अत्याचारांविरोधात आंग सान स्यु की यांनी घेतलेल्या उदासिन भूमिकेसाठी त्यांना दिलेला सर्वोच्च नागरी सन्मान परत घेत असल्याचे आम्नेस्टी इंटरनॅशनलने स्पष्ट केले आहे.

आँग सान स्यु की या आता आशा, साहस आणि मानवाधिकार रक्षणाचे प्रतीक राहिलेल्या नाहीत, या गोष्टीचा आम्हाला अतिशय खेद होत आहे, असे आम्नेस्टी इंटरनॅशनलचे प्रमुख कूमी नायडू यांनी आंग सान स्यु की यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र याबाबत आँग सान स्यु की यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आम्नेस्टी इंटरनॅशनलने आँग सान स्यु की यांना सन 2009 साली अँबेसेडर ऑफ कॉन्शन्स हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला होता, त्या काळात आँग सान स्यु की यांना म्यानमारमधील लष्करी राजवटीने नजरकैदेत ठेवलेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)