आमिर होणार ‘स्लीम अॅन्ड ट्रीम’

“ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ आपटल्यावर आमिर खानने आपल्या पुढच्या सिनेमाची निवड जरा काळजीपूर्वक करण्याचे धोरण अवलंबले आहे. आता त्याच्याकडे पुढच्या सिनेमासाठी चार पर्याय उपलब्ध आहेत आणि आमिरने त्याच्या आगामी सिनेमासाठी त्यापैकी एका पटकथेची निवडही केली आहे. त्याच्या या सिनेमाची कथा जबरदस्त असेल पण त्यातील आमिरची व्यक्तिरेखा मात्र अगदीच दुबळी असणार आहे. म्हणजे आमिर अगदी स्लीम ट्रीम असा दिसणार आहे.

नुकतेच आमिरने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की त्याचा पुढचा सिनेमा कोणता असेल, याचा निर्णय तो महिन्याभरात घेईल. आता जरी चार चांगल्या पटकथा डोळ्यासमोर असल्या तरी अद्याप त्यापैकी कोणत्याही कथेवर आपण 100 टक्के लक्ष केंद्रित केलेले नाही, असेही आमिरने सांगितले. हा सिनेमा आमिर स्वतः प्रोड्युस देखील करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या आमिर त्यापैकी दोन सिनेमांबाबत विचार करतो आहे. दोन्हीमध्ये त्याचा रोल अगदी सडपातळ व्यक्तीचा असणार आहे. स्लीम होण्यासाठी आमिरने आपल्या आहारावर नियंत्रण आणायला सुरुवात केली आहे. आपल्या रोलला अनुसरून त्याने स्वतःचा डाएट प्लॅनदेखील केला आहे. आता तो नवीन प्लॅननुसार वर्कआऊटही करायला सुरुवात करणार आहे.
आमिरला स्वतःला अगदी सडपातळ स्थितीमध्ये बघायचे आहे. त्यासाठी तो देखील या नवीन रोलची आतुरतेने वाट बघतो आहे.

आमिरचा महत्त्वाकांक्षी सिनेमा “महाभारत’ असेल. तो याचीच तयारी करत असेल, अशी अफवा आहे. पण आमिरने अद्याप “महाभारत’ची अधिकृत घोषणा केलेली नाही. आमिर स्वतःच या नवीन सिनेमाची निर्मिती करणार असल्यामुळे हा नवीन सिनेमा “महाभारत’ असेल, असे वाटू शकते. पण तसे नाही. जेव्हा आमिर “महाभारत’ करेल, तेव्हा मीडियाला नक्की सांगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)