आमिर खान साकारणार ओशो…

मिस्टर परफेक्‍शनिस्त आमिर खानने वर्षातून केवळ एकच सिनेमा करण्याचे ठरवले आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा हा एकच सिनेमा इतरांच्या वर्षातल्या 3-4 सिनेमांचा रेकॉर्ड तोडण्यास पुरेसा होतो. आमिरने त्याचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या “महाभारत’ची तयारी सुरू केली आहे आणि आमिर गुलशन कुमारच्या बायोपिकमध्येही काम करणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी समजले होते. मात्र या निव्वळ अफवा ठरत आहेत. कारण आमिर “ओशो’च्या जीवनावरील सिनेमामध्ये ओशोंच्याच रुपात दिसणार आहे. त्याच्याबरोबर आलिया भट देखील या सिनेमात दिसणार आहे.

“ओशो’वरच्या या सिनेमाचे शुटिंग याच वर्षी सुरु होणार आहे. शकुन बत्रा यांच्या या सिनेमाला आमिरने ग्रीन सिग्नल दिला आहे, असेही समजले आहे. मात्र या बातमीला अद्याप अधिकृतपणे कोणी घोषित केले गेलेले नाही. आमिर स्वतःहून आपल्या सिनेमाबद्दल कोणतीही घोषणा करत नाही. त्यामुळे जोपर्यंत याची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत हे नुसते गॉसिप आहे, असे म्हणावे लागेल. “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’नंतर आमिर कोणत्या सिनेमाला होकार देतो, त्यावरच या प्रश्‍नाचे खरे उत्तर समजू शकेल. पण ओशोंवर एक बायोपिक येऊ शकतो आहे, एवढी माहिती तरी आता मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)