आमिर खानच्या महाभारतात तिन्ही खान एकत्र

आमिर खान पुढील वर्षापासून 10 वर्षे फक्‍त महाभारत या एकाच ड्रिम प्रोजेक्‍टवर काम करणार आहे, हे आता सगळ्यांना माहिती आहे. त्याने यासाठी अनेक सिनेमे नाकारलेही आहेत. या विशालकाय प्रोजेक्‍टसाठी चक्क तीन सिनेमांची सिरीज करण्याचे आमिरने ठरवले आहे आणि त्यासाठी मुकेश अंबानींकडून 1,100 कोटी रुपयांचे बजेटही मिळवले आहे. तसेच या अतिविशाल प्रोजेक्‍टसाठी भरभक्कम स्टारकास्टही आवश्‍यक आहेत. आमिरच्या या महाभारतामध्ये बॉलिवूडमधील तिन्ही खान मंडळी एकत्र येणार असल्याचे ऐकिवात आहे.

हे तिघे आतापर्यंत कोणत्याच सिनेमामध्ये एकत्र आलेले नाहीत. आमिर आणि सलमान “अंदाज अपना अपना’मध्ये तर सलमान शाहरुख हे “करण अर्जुन’मध्ये एकत्र आले होते. पण तिघे एकत्र कधीच नव्हते. विशेषतः आमिर आणि शाहरुख तर स्टेजवरही एकत्र आलेले नाहीत. आता महाभारतामध्ये आमिर स्वतः जर श्रीकृष्णाची भूमिका करणार असेल, तर सलमान आणि शाहरुखला कोणता रोल देणार ही उत्सुकता आहे. अर्थातच पांडवांपैकी एखादा रोल या दोघांच्या वाट्याला येण्याची शक्‍यता कमीच आहे. मग कौरवांपैकी एखाद्या रोलमध्ये या दोघांची वर्णी लागू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)