आमिर खानच्या “महाभारत’ला ब्रेक

एखादा बिग बजेट प्रोजेक्‍ट सुरू करणे आणि तो पूर्णत्वास नेणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वास्तविकतेचे भान न राखल्यामुळे अनेक बिग बजेट प्रोजेक्‍ट पूर्ण होऊ शकलेले नाहीत. असाच एक बिग बजेट प्रोजेक्‍ट करण्याचे स्वप्न आमिर खानने बघितले होते.

“महाभारत’ही पाच सिनेमांची शृंखला करण्याचे त्याने ठरवले होते. पण आता हा प्रोजेक्‍ट गुंडाळला जाण्याची शक्‍यता आहे, असे समजते आहे. “महाभारत’च्या प्रोजेक्‍टवर आमिर खानला 5 वर्षे काम करावे लागणार होते. या कालावधीमध्ये त्याला इतर कोणताही सिनेमा करता येणार नव्हता. या संपूर्ण प्रोजेक्‍टवर खर्चही खूप येणार आहे. त्यासाठीचे बजेट अव्वाच्यासव्वा जास्त आहे. त्यामुळे त्यात जोखीमही खूप होती.

सिनेमावरून एखादा वाद उद्‌भवायला नको, याचीही चिंता होती. या सगळ्या गोष्टींचा सविस्तर विचार करून आमिरने आपला हा ड्रीम प्रोजेक्‍ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते आहे. आता स्क्रीन सिनेमाच्या ऐवजी वेब सिरीजच्या माध्यमातून आमिर “महाभारत’ बनवण्याची शक्‍यता आहे.

मात्र त्याबाबतचा निर्णयही अद्याप निश्‍चित नाही. आमिरने जर याबाबतचा निर्णय घेतला तर त्याच्या लाखो फॅन्सला मोठा झटका बसणार आहे. त्याच्या फॅन्सनी या “महाभारत’कडून खूप अपेक्षा ठेवलेल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)