आमिरने “मोगल’ चित्रपट सोडला 

सध्या सर्वत्र #METOO वादळ घोंघावत असतानाच बॉलिवूडचा परफेक्‍शनिस्ट आमिर खान याने त्यावर आता मोठा निर्णय घेतला आहे. त्याने लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट सोडला आहे. याबाबतची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे.

मी ज्या व्यक्तीसोबत चित्रपट करणार होतो त्याच्यावरील लैंगिक छळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या चित्रपटातून बाजूला होत असल्याचे आमिरने म्हटले आहे. मी कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करत असल्याचे आमिरने म्हटले आहे.

आमिर खानने लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या एका दिग्दर्शकाच्या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. आमिर खानने त्याची पत्नी किरण राव आणि स्वतःच्या वतीने एक पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूर याच्या “मोगुल’ या आगामी चित्रपटात आमिर काम करणार होता. पण त्याने आता चित्रपट सोडला आहे.

ज्या व्यक्तीसोबत आम्ही चित्रपट करणार होतो त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले असल्याचे आम्हाला समजले. आम्ही त्याबाबत चौकशी केली असता, लैंगिक छळाबाबतचे ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळाली. अद्याप त्या प्रकरणाचा निकाल न आल्यामुळे मी या चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला, असे आमिरने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)