आमिरने तब्बल तीस किलो वजन घटवले

आमिर खानचा महत्वाकांक्षी सिनेमा दंगलसाठी त्याने गेल्या वर्षी आपले वजन बरेच वाढवले होते, सिनेमातील पात्राची गरज म्हणून आमिर आपल्यामध्ये अशा स्वरूपाचे बदल करतच असतो. मात्र, यामुळे त्याला काही त्रास होऊ नये यासाठी त्याचे कुटुंबियदेखील चिंतेत पडले होते. 52 वर्षीय आमिरने दंगलसाठी आपले वजन 98 किलोपर्यंत वाढवले होते. आता त्याने आगामी सिनेमा ठग्ज ऑफ हिन्दोस्तानसाठी आपले वजन 30 किलोपर्यंत घटवले आहे. आता त्याने आपले वजन 70 किलोपर्यंत खाली आणले आहे. त्याच्या पीके आणि धूम 3 या सिनेमावेळी जितके वजन होते, त्यापेक्षा हे वजन कमी आहे. सध्या आमिर माल्टामध्ये ठग्ज ऑफ हिन्दोस्तान या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील आमिरचे सहकलाकार अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख यांनी देखील आमिरला जॉईन केले आहे. आमिरच्या शरीरयष्टीतील बदलाचे कायमच कौतुक होत असते. यंदा देखील त्याच्या आगामी भुमिकेसाठी वाहवा मिळवण्यात तो यशस्वी होईल अशी स्थिती आहे. कारण ठग्ज ऑफ हिन्दोस्तानचे पहिले पोस्टर यापूर्वीच रिलीज झाले असून त्यातील आमिरसह इतर कलाकारांच्या वेशभूषेवरून हा सिनेमाही नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी खास ट्रिट असेल असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)