आमिरने “ठग्ज…’च्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली

एखादा सिनेमा चालणे किंवा आपटणे यासाठी सर्वसाधारणपणे दिग्दर्शकाला जबाबदार धरले जाते. पण अपयशाची जबाबदारी अभिनेत्याने स्वीकारण्याची उदाहरणे फारच कमी प्रमाणात आढळतील. आता आमिर खानने त्याचा लीड रोल असलेल्या “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या अपयशाबाबत हा मोठेपणा दाखवला आहे. “ठग्ज…’ हा मल्टीस्टार आणि बिगबजेट सिनेमा होता. त्याच्याबाबत प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होत्या. मात्र सुमार कथा मांडणीमुळे “ठग्ज…’ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही. व्यवसायिक नुकसान तर झालेच पण प्रेक्षकांचीही निराशा झाली. त्याबद्दल आमिर खानने जाहीरपणे प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

तसे पाहता आमिर हा काही निर्माता नव्हता किंवा दिग्दर्शकही नव्हता. पण तरीही त्याने प्रेक्षकांची जाहीर माफी मागण्याचे कारण काय ? सिनेमाचे यश किंवा अपयश अनिश्‍चित असते. पण “ठग्ज…’च्या दिग्दर्शनामध्ये आमिरने सातत्याने आपल्या कल्पना लढवल्या होत्या. एका अर्थी तो या सिनेमाचा “घोस्ट डायरेक्‍टर’ बनला होता. या एकाच कारणासाठी आमिरने माफी मागण्याचे धाडस दाखवले आहे.

“ठग्ज…’ नक्की का आपटला याचे कोणतेही विश्‍लेषण प्रसिद्धी माध्यमांना द्यायची गरज नाही, अशा स्पष्ट सूचना यशराज बॅनरच्यावतीने निर्माता आदित्य चोप्राने दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्यना देऊन ठेवल्या होत्या. त्यानुसार या सिनेमाच्या फ्लॉप होण्याबाबत कंपनीकडून कधीच कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही.

पण तरीही आमिरने स्वतःहून अपयशाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या जरा जास्तच अपेक्षा असतात. विषय निवडण्यामध्ये आपलीच चूक झाल्याचे आमिरला वाटत असावे. त्याशिवाय आमिर नेहमीच आपल्या सिनेमाच्या स्क्रीप्टपासून ते एडिटिंगपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत असतो. त्याला आपल्या सिनेमातील सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करून हव्या असतात. त्याचे यश त्याच्या सिनेमांना मिळत असतेच. पण काहीवेळा त्याचे अंदाज चुकल्याने “ठग्ज…’सारखा मोठा सिनेमा अपयशीही ठरू शकतो. या अनावश्‍यक हस्तक्षेपामुळेच त्याला “मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ अशी उपाधी मिळाली आहे. त्यामुळे त्याने अपयशाची जबाबदारी स्वीकारून माफी मागणे अगदी योग्यच आहे, असे काही निरीक्षकांचे मत आहे.

ही जबाबदारी स्वीकारण्याचे मोठेपण यापूर्वी सलमान खानने “ट्युबलाईट’च्या बाबतीत दाखवले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)