आमदार सोनवणेंच्या घरासमोर जागरण गोंधळ

आळेफाटा- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जुन्नर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने आज (रविवारी) आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानासमोर दिवसभर जागरण गोंधळ घालून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत बुधवारी (दि. 1) जुन्नरमध्ये मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर आज सकाळी नऊपासून जुन्नर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जुन्नर तालुक्‍याचे आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानासमोर जागरण व गोंधळ घालून ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सोनवणे यांच्यासमोर विविध मागण्या मांडण्यात आल्या. तर आमदार सोनवणे यांनी मराठा अरक्षणा संदर्भात विधानसभेच्या विशेष अधिवेषनात आवाज उठवावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना व आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश उगले यांनी आंदोलना दरम्यान भेट दिली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दिवसभर सुरु असलेले हे आंदोलन शांततेत पार पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)