आमदार शिवतारे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे टाळनाद आंदोलन

सासवड- सासवड तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 27) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या विरोधात टाळनाद आंदोलन करण्यात आले.
हडपसर-जेजुरी महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने हा महामार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे तो त्वरित पूर्ण करण्यात यावा, सासवड येथील प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण करावे, पुरंदर पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे स्थलांतर करावे, पारगाव-माळशिरस व धनकवडी-मांढर येथील पाणीपुरवठा योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी टाळनाद आंदोलन करण्यात आले. यामध्ये जालिंदर कामठे, दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, शिवाजी पोमण, पुष्कराज जाधव, राहुल गिरमे, गौरी कुंजीर समवेत अन्य पदाधिकारी सहभागी होते.
खासदार सुळे यांनी सांगितले की, पारगाव-माळशिरस पाणीपुरवठा योजना गेल्या 9 वर्षांपासून बंद आहे. आमदार केवळ पोपटपंची करीत आहेत. तालुक्‍यातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना नेमक्‍या कधी सुरू होणार आहेत. मध्यंतरी पाणी टंचाई आढावा बैठकीत विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्‍यातील पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी निधी मंजूर झाल्याचा गाजावाजा केला. मात्र, बोलघेवड्या मंत्र्यांनी एकही योजना चालू केलेली नाही.
तालुकावर सध्या भीषण दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. शेतकरी पाणीटंचाईने हवालदिल झालेले आहेत. तरीही पुरंदर तालुक्‍यात पूर्ण दुष्काळ जाहीर झालेला नाही. दुष्काळग्रस्त गावांत चारा आणि पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्‍यक असलेला दुष्काळ आराखडा देखील तयार केला गेला नाही. याकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)