आमदार दतात्रय भरणे यांचा आता धनगर आरक्षणांसाठी लढा

विधानभवनासमोर खांद्यावर घोंगडे टाकून सरकारचे लक्ष वेधले

रेडा- हिवाळी अधिवेशन सुरू असताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्‍यातील शेतीला व जनतेला हक्‍काचे पाणी शासनाकडून प्राप्त करून घेण्यासाठी भर अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना घेऊन धनगर समाजाची घोंगडी खांद्यावर घेऊन सभागृहात प्रवेश केला. यावेळी धनगर समाजाला आरक्षण द्या, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
इंदापूर तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी नेहमीच विधानभवनात आपल्या कामाचा ठसा उमटवित असतात. यामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापाठोपाठ आमदार भरणे यांनी राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शुक्रवार (दि.30) रोजी माजी मंत्री प्रकाश शेंडगे, आमदार रामहरी रुपनवर, आमदार रामराव वडकुते यांना सोबत घेऊन धनगर समाजाला सरकारने आरक्षण देण्याच्या शब्द पुरा करुन द्यावा, अशी मागणी करत सरकारचे लक्ष वेधले. सत्तेवर येण्याअगोदर राज्यातील धनगर समाज बांधवांना हक्‍काचे आरक्षण देतो, असा टाहो फोडला होता. आता आवाज कोणी दाबला. आरक्षण कधी देणार, अशी मागणी आमदार भरणे यांनी केली. आता धनगर समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण दिलेच पाहिजे, अशी मागणी आमदार भरणे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)