आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस आजपासून प्रारंभ

मसूर – आ. बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील स्पोर्टस क्‍लबतर्फे दि. 5 ते दि. 9 जानेवारी या कालावधीत आमदार चषक 2019 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दि. 5 रोजी स. 9.30 वाजता जशराज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

बक्षीस वितरण बुधवार दि. 9 रोजी सायंकाळी 5 वाजता आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, उपसभापती सुहास बोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेमधील प्रथम क्रमांकासाठी सिध्दार्थ चव्हाण यांच्यातर्फे 41 हजार 101 रुपये, द्वितीय क्रमांकास सागर जाधव यांच्यातर्फे 31 हजार 101 रुपये, तृतीय क्रमांकास माणिकराव पाटील घोणशी यांच्यातर्फे 21 हजार 101 रुपये तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी उपसभापती सुहास बोराटे यांच्यातर्फे 11,101 रुपये रकमेचे रोख बक्षीस आणि चषक देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)