आमदार, खासदार शेतकऱ्यांचे शत्रू

रघुनाथदादांची टीका; शेतकऱ्यांच्या परिषदेत आंदोलनाचा सूर
राहाता –देशातील खासदार आणि आमदार तुमचे आमचे दुश्‍मन आहेत. कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा नंबर एकचा शत्रू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना खासदार आणि आमदार जबाबदार आहेत. त्यांच्या विरोधात रान उठविण्याची वेळ आता आली असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.
राहाता येथे आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेत पाटील अध्यक्षपदावरुन बोलत होते. ज्येष्ठ नेते लक्षमणराव वडले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले, स्वागताध्यक्ष ऍड. अजित काळे, बाळासाहेब पटारे, शंकरराव गायकवाड, ऍड. बन्सी सातपुते, कॉ. राजेंद्र बावके आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, की कॉंग्रेस आणि मोदी दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयातीला कर लावून निर्यातीला प्रोत्साहन दिल्यास शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के भाव देणे शक्‍य आहे; परंतु उद्योगपत्तींना कच्चा माल व मजूर स्वस्तात द्यायचे सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याच पाहिजेत. त्यासाठी सरकारला भूमिका बदलण्यास भाग पाडावे लागेल, हे शक्‍य न झाल्यास निवडणुकांच्या माध्यमातून या सरकारला घरी पाठवावे लागेल. 1935 पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल वापराची चर्चा चालू आहे; पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर इथेनॉल वापराचा निर्णय घेतला असता तर आज उसाला पाच हजार रुपये भाव मिळाला असता. सरकारने शेतकरी संघटनेला फोडण्याचे काम केले. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पाशा पटेल, रवींद्र तुपकर यांनी लबाडीने सत्ता मिळविली. लबाडी हे त्यांचे धेय्य असून हे सर्व सत्तेचे मिंधे आहेत. राज्यकर्त्यांचे मीठ खाल्ले, म्हणून ही मंडळी बोलत नाहीत.
वडले म्हणाले, “” आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. केलेला कायदा बलताही येतो; पण ते तुमच्या उग्रतेवर अवलंबून असते. गुजरातमध्ये उसाला 4700 रुपये, कोल्हापूरमध्ये 3200 रुपये भाव दिला जातो, मग आशिया खंडात पहिला साखर कारखाना असलेला विखे पाटील कारखाना 2000 रुपये भाव कसा काय देतो? सर्व कारखान्याचे दारू, बॅगेसचे भाव सारखेच असतात. मग उसाचे भाव भिन्न कसे? या पुढाऱ्यांना उसाने बडवल्याशिवाय भाव देणार नाही.”
बाळासाहेब पठारे, शंकरराव गायकवाड, नांदखिले, ऍड. सातपुते, कॉ. बावके, ऍड. अजित काळे यांची भाषणे झाली. प्रारंभी राजेंद्र पठारे यांनी स्वागत केले. रुपेंद्र काले यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ऍड. काळे यांनी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)