आमदार-खासदार वकिली करू शकतात – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – आमदार आणि खासदार वकिली करू शकतात. त्यांना वकिली करण्यापासून रोखता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

भारतीय विधिज्ञ परिषदेचा (बीसीआय) नियम 49 हा केवळ पूर्णवेळ पगारी सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतो. त्यामुळे आमदार-खासदारांना वकिली व्यवसाय करण्यापासून रोखता येणार नाही, असे भाजपा नेते आणि वकील अश्‍विनी कुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए एम खानविलकर आणि न्या. डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. आमदार-खासदार हे पूर्णवेळ सरकारी कर्मचारी नाहीत हे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार आणि खासदारांना मासिक वेतन मिळत असल्याने त्यांना वकिली पेशा करण्यापासून रोखावे अशी मागणी याचिकाकर्ते अश्‍विनी कुमार उपाध्याय यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)