आमदार अरुण जगताप यांना जामीन

नगर – जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणी हल्ला प्रकरणातील आरोपी आमदार अरुण जगताप पोलिसांत हजर झाले. त्यांच्याबरोबर स्व.कैलास गिरवले यांचा मुलगा ओंकार हेही भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आज दुपारी हजर झाले. त्यांना अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर दोघांच्यावतीने ऍड.महेश तवले यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. केडगाव येथे दि.7 एप्रिल रोजी सायंकाळी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. त्यावेळी आ. संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी आ. जगताप यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून, त्यांना सोडून देण्याची मागणी करीत जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड करून धुडगूस घातला होता. कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्‍याने तोडून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते.
या प्रकरणी 250 ते 300 जणांवर सार्वजनिक विद्रुपीकरण, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुमारे 80 ते 90 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली होती.
आमदार अरुण जगताप हे आज दुपारी भिंगार पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांना आज न्यायलयात हजर करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)