आमदाराविरोधात आरोपपत्र दाखल झाल्याने भाजपची कोंडी

विरोधकांनी लावून धरली हकालपट्टीची मागणी
लखनौ – उत्तरप्रदेशातील भाजपचे वजनदार आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्याविरोधात सीबीआयने बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे विरोधकांनी सेंगर यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी लावून धरली आहे. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्तारूढ भाजपची कोंडी झाली आहे.

उत्तरप्रदेशच्या उन्नाव मतदारसंघातून तब्बल चार वेळा विधानसभेवर निवडून गेलेले सेंगर बलात्काराच्या आरोपावरून कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांच्याशी संबंधित घडामोड उन्नाव बलात्कार प्रकरण म्हणून देशभरात गाजत आहे. त्यामुळे भाजपची गोची झाली आहे. अशातच सीबीआयने बुधवारी सेंगर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे सप आणि कॉंग्रेस या विरोधी पक्षांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

आरोपपत्र दाखल झालेल्या नेत्याची भाजपमधून हकालपट्टी व्हायला हवी. मात्र, अशा नेत्यांचा भाजपकडून बचाव केला जात असल्याचा इतिहास आहे. इतरांकडे बोट दाखवण्यापूर्वी भाजपने पार्टी विथ डिफरन्स ही ओळख देणारे उदाहरण घालून द्यायला हवे, असे सपने म्हटले आहे.

विरोधकांच्या हल्ल्यानंतरही भाजपने सेंगर यांच्याबाबत सबुरीचेच धोरण स्वीकारल्याचे दिसते. सेंगर यांच्या हकालपट्टीच्या मागणीवर निर्णय घेणे घाईचे ठरेल. त्यांच्याशी संबंधित प्रकरणी घाईने निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. भाजपने कधीच तत्वांशी तडजोड केलेली नाही. नक्कीच निर्णय होईल, असे प्रदेश भाजपने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)