आमदारांना निधीवाटपच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई – आमदारांना निधीवाटपच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपात वाद होण्याची  शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यामुळे आता  उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी या मुद्यावर भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

या बैठकीला ते आपल्या पक्षाच्या आमदारांनाही सोबत नेणार आहेत. यापूर्वीही शिवसेना आमदारांनी पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार केली होती .सत्तेत सहभागी असूनही कामं होत नाहीत. मतदारसंघात पुरेसा विकास निधी उपलब्ध होत नाही याबद्दल शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र रोष आहे. आज याबाबत  उद्धव  ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)