आमदारांच्या वाहनांच्या स्टीकर्सचा गैरवापर

नितेश राणे यांची विधानसभेत माहिती
मुंबई – अधिवेशन काळात विधिमंडळाच्या परिसरात आमदारांची वाहने पार्किंग करण्यासाठी स्टीकर्स दिली जातात. मात्र, काही लोक हे स्टिकर्स आपल्या गाडीवर लावून गैरवापर करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी विधानसभेत केली.

नितेश राणे यांनी शुक्रवारी माहितीच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत हा विषय उपस्थित केला. आमदारांना अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला स्टीकर त्यांच्या वाहनावर लावण्यास देण्यात येतो. बाळा खोपडे नामक व्यक्ती त्याच्या वाहनावर हा स्टीकर लावून राजरोस फिरत आहे. बाळा खोपडे नावाचा कोणीही आमदार नाही. मग या व्यक्तीकडे हा स्टीकर आला कुठून याची चौकशी झाली पाहिजे. यातून गंभीर घटना घडू शकते. या प्रकरणाची दखल घेऊन सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

भाजपाच्या मनिषा चौधरी यांनी आपल्याही मतदारसंघात अशा घटना उघडकीस आल्या आहेत. आमदाराचे स्टीकर लावून वाहने फिरत असतात, असे सांगत त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी सरकार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)