आमदारसाहेब मनाला लावून घेउ नका…

भाजपा आमदार संगीत सोम हरवल्याची “पोस्ट
नवी दिल्ली – भाजपा आमदार संगीत सोम हरवल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या तिघांना उत्तर प्रदेश पोलीसांनी अटक केली आहे. 17 ऑगस्ट रोजी सरधना येथे एका अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून सहा जणांनी तिला जिवंत जाळले होते. या घटनेने सरकार विरोधात तीव्र क्षोभ उसळला. लोकांनी सरकार विरोधात सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला होता.

त्यात हरवले आहेत, या शीर्षकाखाली एका पोस्टमध्ये लिहिले होते की,
संगीत सोम 15 ऑगस्टपासून हरवले आहेत. सरधना येथे घडलेल्या घटनेबाबत तुम्हाल कोणी काही बोलणार नाही. या बाबतीत तुम्ही काही मनाला लावून घेऊ नये, कारण पीडिता काही तुमची मुलगी नव्हती. तुम्ही समाजाला एक कलंक असून केवळ मते मिळवणे एवढाच तुमच्या काळजीचा विषय आहे. कोणी तुमची छाती मोजणार नाही. जो कोणी संगीत सोम यांच्याबद्दल काही माहिती देईल त्याल रु. 101 इनाम देण्यात येईल.

-Ads-

ही पोस्ट सरधना येथील एजाज खत्री यांनी व्हाट्‌सऍप ग्रुपवर शेयर केली. या ग्रुपचे काही भाजपा नेतेही सदस्य आहेत. या पोस्टबद्दल भाजपा नेते विनोद जैन यांना समजताच त्यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. संगीत सोम यांनीही आपली प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नाबद्दल एफआयआर दाखल केला. त्यानंतर एजाज खत्री आणि अन्य दोघांना पोलीसांनी अटक केली.या प्रकरणी पुढील तपास चालू असल्याची माहिती सरधना पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप सिंह यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)