आमदाबादसह परिसरात वादळी पाऊस

अण्णापूर-शिरुर तालुक्‍यातील आमदाबादसह परिसरात सोमवारी (दि.1) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ झाली. पावसाचा आणि वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आवारात असणारे जूने लिंबाचे झाडही भुईसपाट झाले. दरम्यान, शाळेत लहान सुट्टीनंतर वारे आणि पावसामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मैदानावरुन त्वरीत वर्गात बसविले. त्यानंतर काही मिनिटांत ते झाड मैदान आणि शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयावर कोसळले. यामध्ये कार्यालयाचे नुकसानही झाले. शिक्षकांचे प्रसंगावधान आणि विद्यार्थ्यांच्या सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. या पावसामुळे परिसरातील शेतातील ऊस आणि कडवळ यासारखी पिकेही भुईसपाट झाल्याने नुकतीच काढणी केलेली बाजरीची कणसेही भिजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. या पावसामुळे दिवसभराच्या उकाड्यातून नागरिकांची सुटका मिळाली. तर, कांदा आणि तत्सम पिकांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार आहे. अर्थात परतीच्या या पावसामुळे आमदाबादसह परिसरात नुकसान अधिक झाले असून यानंतरच्या काही दिवसात पावसाची अशीच स्थिती राहणार असल्याने शाळा आणि घरांच्या परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी करणे आवश्‍यक आहे, असे बोलले जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)