आमच काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल ; शेतकऱ्यांच्या लेकींचे अन्नत्याग आंदोलन

अहमदनगर: पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाला दोन वर्ष उलटल्यानंतर आता पुणतांब्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेकी मैदानात उतरल्या असून वयाच्या विशीमध्ये असलेल्या या १० ते १५ शेतकऱ्यांच्या लेकींनी पुणतांबे येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे.

किसान क्रांती मोर्चाच्या अंतर्गत सुरु असलेल्या या धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला योग्य हमीभाव, शेतकऱ्यांनी विकलेल्या दुधाला ५० रुपये प्रति लिटर भाव राज्यसरकारने द्यावा या आहेत. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष दिले नाही आणि काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा देखील आंदोलक मुलींनी दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पुणतांबा गावात शुभांगी जाधव,पूनम जाधव, निकिता जाधव शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून तीन दिवसात मुलींचे वजन दोन किलोने घटले आहे.

दरम्यान, पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या लेकींचे हे अन्नत्याग आंदोलन या बेजबाबदार भाजप सरकारला सत्तात्याग करायला भाग पाडणार ! असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

 

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1093125891096375296

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)