आमच्या वेळी गोलंदाजी करणे सोपे होते…

महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची कबुली 
कोलकाता – टी-20 क्रिकेटची लोकप्रियता कळसाला पोहोचली असताना सध्याच्या झटपट क्रिकेटच्या काळात फलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. जगभरातील प्रमुख फलंदाज चौकार-षटकारांची आतषबाजी करीत बहुतांश गोलंदाजांवर वर्चस्व गाजवीत असतात. त्यामुळे गोलंदाजांची कामगिरी अधिकच अवघड बनली आहे. सध्याच्या काळात गोलंदाजी करणे खूपच आव्हानात्मक असून आपल्या काळात गोलंदाजी करणे आताच्या तुलनेत खूपच सोपे होते, अशी कबुली श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने दिली आहे.

एका विशेष कार्यक्रमात मुरलीधरन बोलत होता. मुरलीधरन पुढे म्हणाला की, आपल्या 133 कसोटी सामन्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीत जगभरातील अव्वल फलंदाजांना चकविले आहे आणि आपल्या तालावर नाचायलाही लावले आहे. मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकिर्दीत विश्‍वविक्रमी 800 बळी घेतले आहेत. परंतु त्या काळात टी-20 क्रिकेटला तितकेसे महत्त्व आले नव्हते आणि कसोटी किंवा अगदी एकदिवसीय क्रिकेटमध्येही आयपीएलइतके षटकार लगावले जात नसत, असे सांगून मुरलीधरन म्हणाला की, टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर षटकार लगावला जाऊ शकतो. त्यामुळे गोलंदाजांवर सातत्याने दडपण असते.

श्रीलंकेने 1996 मध्ये अर्जुना रणतुंगाच्या नेतृत्वाखाली विश्‍वचषक जिंकला, तो आपल्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण असल्याचे सांगतानाच हैदराबाद सनरायजर्स संघाकडून खेळत असताना 2016मध्ये आयपीएल करंडक जिंकल्याचा क्षणही तितकाच रोमांचकारी असल्याचे मुरलीधरनने नमूद केले. टी-20 क्रिकेट आव्हानात्मक असले, तरी आपल्याला आजच्या युगात खेळायला आवडले असते, असेही त्याने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)