आमच्या तत्पर प्रतिसादानंतर भारताची विमाने घाबरून पळाली ! 

भारताच्या कारवाईवर पाकिस्तानने दिलेली प्रतिक्रीया

इस्लामाबाद – भारताने आज पाक व्याप्त काश्‍मीर आणि खुद्द पाकिस्तानी हद्दीत घुसून जी हवाई कारवाई केली त्याबद्दल पाकिस्तानकडून आलेली प्रतिक्रीया मजेशीर आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय विमानांनी पाकिस्तानी हवाईहद्दीत घुसखोरी केल्यानंतर पाकिस्तानच्या हवाईदलाने त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी आपली विमानेही त्वरीत आकाशात पाठवली. आणि पाकिस्तानी विमाने पाहिल्यानंतर भारताची विमाने घाबरून माघारी फिरली असे त्यांनी म्हटले आहे.

मेजर जनरल असिफ गफूर यांनी म्हटले आहे की घाबरून पळून जाताना भारतीय विमानांनी पाकिस्तानी हद्दीत काही बॉंब फेकले पण ते मोकळ्या जागेत पडले. त्यातून पाकिस्तानचे काही नुकसान झाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. बालाकोट किंवा अन्यत्र झालेल्या हल्ल्यात जीवित हानी झालेली नाही असेही पाकिस्तानने म्हटले आहे. त्यांच्या एका लष्करी अधिकाऱ्याने तर म्हटले आहे की भारतीय विमानांनी घाबरून पळून जाताना बॉम्ब फेकण्याच्या ऐवजी थेट आपल्या विमानातील पेट्रोलच खाली फेकले. मुज्जफराबाद येथेही भारतीय विमानांची घुसखोरी झाल्यानंतर तेथील हवाईदलाने त्यांनाही तत्परतेने प्रत्युत्तर दिले असे पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)