आमच्या आमदारांना भाजपकडून प्रत्येकी शंभर कोटींची ऑफर

कुमारस्वामी यांचा पत्रकार परिषदेत आरोप
बंगळुरू – भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात आमच्या पक्षाचे आमदार फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्यांनी आमच्या आमदारांना प्रत्येकी शंभर कोटी रूपये देण्याचे आमिष दाखवले आहे असा आरोप जनतादल सेक्‍युलरचे नेते कुमारस्वामी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या या अमिषाला आमचा एकही आमदार बळी पडलेला नाही. भाजपने आमच्या बाबतीत हा उद्योग सुरू केला तर आम्हीही त्यांचे दुप्पट आमदार फोडू असे ते म्हणाले.

ते म्हणाले की मला दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे पण मी भाजपबरोबर कदापिही जाणार नाही. उलट मागे मी त्यांच्या बरोबर जाण्याची जी चूक केली होती त्यातून माझ्या वडिलांच्या राजकीय करिअरवर काळा डाग लागला आहे. तो डाग पुसुन टाकण्याची संधी देवाने मला यावेळी दिली असून यावेळी आपण कॉंग्रेससमवेतच सरकार स्थापन करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण भाजपचे राज्याचे निरीक्षक प्रकाश जावडेकर यांना भेटला होता अशा बातम्या आल्या आहेत त्या खऱ्या आहेत काय असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता. प्रकाश जावडेकर कोण? या नावाचा हा कोण सभ्य गृहस्थ आहे? असे प्रश्‍न त्यांनी पत्रकारांनाच विचारले.

दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कुमारस्वामी यांचा शंभर कोटी रूपयांची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की ही शंभर कोटी रूपयांची बातमी केवळ काल्पनिक आहे. भाजपचा घोडेबाजारावर विश्‍वास नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)