आबी रानवडीत आरोग्य शिबीर

पानशेत- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जनसेवा फाउंडेशन, पुणे जिल्हा आरोग्य विभाग, देवयानी हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय – पिंपरी, पंचायत समिती आरोग्य विभाग – वेल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल मोबाइल मेडिकल युनिटअंतर्गत मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन बुधवारी (दि. 28) आबी रानवडी (ता. वेल्हा) येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महिलांच्या आजारासह, रक्तदाब, मधुमेह, हार्निया, तिरळेपणा, कान, नाक, घशाचे आजार, दंत चिकित्सा आदी विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आवश्‍यकतेनुसार गरजू रुग्यांवर मोफत उपचारही पुढील काळात करण्यात येणार आहेत. यावेळी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलवे, पंचायत समिती सभापती, सरपंच उपस्थित होते. आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जनसेवा फाउंडेशनचे डॉ. विनोद शहा, डॉ. हनुमंत चव्हाण, डॉ. सोनाली जोगळेकर, डॉ. अंबादास देवकर, डॉ. आरण के. शेळके, डॉ. मीना शहा, डॉ. सुदशरन मलाजुरे, डॉ. पवन गोंधळेकर, तसेच वेल्हा, पासली, करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे पदाधिकारी यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा लाभ 1540 जणांनी घेतला पैकी 402 रुग्णांना पुण्यातील विविध रुग्णालयांत आवश्‍यतेनुसार उपचार मिळणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)