आबा, दादा समर्थकांमध्ये सोशल मीडियावर कलगीतुरा

आपलाच नेता योग्य कसा याबाबत सोशल मिडीयावर चर्चेला उत
करुणा पोळ
कवठे, दि. 12 – किसन वीर सहकारी साखर कारखान्याची थकलेली ऊस बिले हा सध्याचा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. वृत्तपत्रांसह टीव्ही चॅनेलवर झळकत असलेल्या किसन वीरच्या विषयावरुन आता आमदार मकरंद पाटील आणि कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर शीतयुद्ध सुरु झाले आहे.
थकलेल्या ऊस बिलांसाठी आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या शिलेदारांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत थकलेली बिले तात्काळ द्यावीत व यासंदर्भात विनाविलंब कार्यवाही करावी अशा आशयाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायर केला. मात्र हा व्हीडिओ मदन भोसले यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी या व्हीडिओचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेत आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात टिकाटिप्पणी केली आहे. मदन भोसले समर्थकांनी केलेली टिकाटिप्पणी ही आमदार मकरंद पाटील समर्थकांनी तरी का सहन करावी? त्यामुळे आमदार समर्थकांचाही “इगो हर्ट’ झाल्याने मदन भोसले समर्थकांवर आमदार मकरंद पाटील समर्थक तुटून पडले असून तालुक्‍यातील या दोन्ही गटात प्रत्यक्ष नसला तर सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे.
यामध्ये मदन भोसले यांचे समर्थक हे “कारखान्याचा विकास, 1200 कामगार, 52000 सभासद शेतकरी आणि 6 तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र एवढी मोठी जबाबदारी मदन भोसले सत्ता नसतानाही 15 वर्षे समर्थपणे पेलत असल्याचे सांगतानाच आमदारांवर टीका करत आहेत. तर या टीकेला उत्तर देतानाच आमदार मकरंद पाटील समर्थकदेखील आपल्या नेत्याची भूमिका कशी योग्य आहे ते सांगत आहेत. तसेच “365 गावे व महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संघ चालविणे हे फक्त मकरंद आबाच करु शकतात हेदेखील ठासुन सांगत आहेत.
एकंदरीत दोन्ही गटात सुरु झालेला हा सोशल मीडियावरील वादाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवर यांचे निश्‍चितच परिणाम होणार असल्याचेही काही जाणकार राजकारण्यांमधून बोलले जात आहे.
“भांडू नका’चाही संदेश
आमदार म्हणून मकरंद पाटील ज्याप्रमाणे मतदारसंघ सांभाळत आहेत त्याचप्रमाणे मदन भोसले हे देखील असंख्य अडचणी असतानाही किसन वीर कारखाना सांभाळत आहेत. उद्या आगामी निवडणुकांमध्ये आघाडी झाल्यास कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्रच नांदावे लागणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये वाद घालु नयेत तसेच एकमेकांच्या नजरेत पडू नये अशा आशयाचेही संदेश सोशल मीडियावर फिरु लागले आहेत. याशिवाय आपल्या सर्वांना मिळून शरद पवारसाहेबांना पंतप्रधान करायचं आहे, तसेच मोठमोठे उद्योगधंदे वाईत यावेत व वाई समृद्ध व्हावे, प्रतापराव भोसले व लक्ष्मणतात्या यांची जनता शिक्षण संस्था सोडून, गरवारे कंपनी सोडून आणखी नव्या संस्था, उद्योग उभे राहिले पाहिजेत त्यासाठी सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे, त्यासाठी भांडू नका रे बाबांनो असा संदेशही याच सोशल मीडियावरुन दिला जाऊ लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)