“किसन वीर’ येथे विनायकदादा, विलासराव शिंदे यांना आबासाहेब वीर पुरस्कार प्रदान
भुईंज) – आबासाहेब वीर हे सृष्टीचा उद्रेक होते. म्हणूनच त्यांच्यासारखी माणसं ना कोणत्या एका गावाची ना कोणत्या एका प्रांताची असतात. जागतिक पातळीवर ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या क्रांतिकारकांच्या ओवीत आबासाहेब वीर होते. शेवटचा दिस गोड व्हावा या भावनेतून जात असताना आबांच्या नावाच्या पुरस्काराचा पाठिवर हात पडल्याने भरुन पावलो, असे भावोद्‌गार माजी मंत्री वनाधिपती विनायकराव पाटील यांनी काढले.

देशभक्‍त आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने विनायकराव पाटील यांना ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या हस्ते आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार तर उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.

कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, डॉ. सौ. निलिमा भोसले, केतन भोसले, डॉ. सुरूभि भोसले, प्रल्हादराव चव्हाण, ऍड. जयवंतराव केंजळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.आबासाहेब वीर सामाजिक सामाजिक पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये, सन्मानपत्र, शाल, पुुष्पगुच्छ असे होते तर आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्काराचे स्वरुप एक्कावन हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)