आबासाहेब काकडे हायस्कुल, कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन

शेवगाव – या विद्यालयाला कॉ. आबासाहेब काकडे यांचा समृद्ध वारसा आहे. त्यांनी तत्त्वांशी बांधिलकी जपली. कोणत्याही गोष्टीशी तडजोड केली नाही. सत्तेला लाथ मारली. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी लढा दिला. आबासाहेब हे अनाथांचे नाथ होते. स्व. निर्मलाताई सर्वसामान्यांसाठी जगल्या. जातीयवाद कधी केला नाही. माणुसकी हीच जात व माणूस हाच धर्म आहे हे त्यांनी शिकवले. या तत्त्वावरच या शिक्षण संस्थेची आदर्श वाटचाल असल्याचे प्रतिपादन विनोदाचार्य ऍड. अनंत खेळकर यांनी केले.

येथील आबासाहेब काकडे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षपदावरुन खेळकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्या हर्षदा काकडे, माजी सभापती डॉ. टी. के. पुरनाळे, मध्यवर्ती समितीच्या अध्यक्ष प्रा. शिवनाथ देवढे, दिनेश दळवी, नगरसेवक सागर फडके, वजीर पठाण, रावसाहेब बर्वे उपस्थित होते. मंचावर प्राचार्य़ भानुदास भिसे, उपप्राचार्य़ गणपती पोळ, करमसिंग वसावे, चंद्रकांत आहेर, रावसाहेब नन्नवरे, शिक्षक प्रतिनिधी रघुनाथ कंठाळी, नारायण पाटोळे, प्रा. सुनील आढाव उपस्थित होते.

-Ads-

हर्षदा काकडे म्हणाल्या की, विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यालयाचे नाव राज्यभर पसरवले ही भूषणावह बाब आहे. संस्था सतत माणसे जोडण्याचे व घडविण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याबरोबरच विद्यार्थी संगणक क्षेत्रात निष्णात व स्पर्धा परीक्षेतून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे काम करत आहेत. यावेळी शेकडो गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या तीन दिवशीस संमेलनप्रसंगी आयोजित केलेल्या मेंहदी, रांगोळी, हस्तकला प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्योती मंत्री, संगिता गट्टाणी, डॉ. सायली काकडे यांच्या हस्ते करण्यात आल होते. विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या करण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)