आफ्रिदीचा पाकला घरचा आहेर-आधी आपले घर सांभाळा….मग काश्‍मीरची चिंता 

नवी दिल्ली – आधी आपले घर सांभाळा…..मग पाकिस्तानची चिंता करा, अशा शब्दात माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. शाहिद आफ्रिदीचे हे वक्तव्य इंग्लंडची संसद-हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आलेले आहे. आफ्रिदीने विद्यार्थ्यांसमोर बोलताना सांगितले, की पाकिस्तानला काश्‍मीरची गरज नाही.

पाकिस्तानला आपलेच चार प्रांत सांभाळता येत नाहीत, त्यामुळे त्याने काश्‍मीरची चिंता करणे सोडून द्यावे. पाहिजे तर काश्‍मीर भारतालाही देऊ नका. ते स्वतंत्र राहू द्या. असे आफ्रिदीने म्हटले आहे. परदेशी भूमीवर शाहिद आफ्रिदीने केलेल्या या वक्तव्यावर पाकिस्तानमध्ये वादंग माजले आहे.

शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन या आपल्या संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त शाहिद आफ्रिदी सध्या इंग्लंडमध्ये आलेला आहे.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार इम्रान खान पंतप्रधान बनल्यापासून काश्‍मीरचा विषय चर्चेत आहे. जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न लवकरच सोडवला पाहिजे असे इम्रान खान यांनीही म्हटले आहे. शाहिद आफ्रिदीने यापूर्वीही काश्‍मीरसंबंधी अनेकदा ट्‌विट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)