आफ्रिकेत सशस्त्र बंडाळ्यांमुळे 20 वर्षात 50 लाख बालकांचे बळी

पॅरिस (फ्रान्स) – आफ्रिकेतील सशस्त्र बंडाळ्यांमध्ये 20 वर्षात 50 लाख बालकांचे बळी गेले आहेत. आफ्रिकेतील सशस्त्र बंडाळ्यांच्या संशोधनात ही गोष्ट उघड झाली आहे. सन 1995 ते 2015 या काळात आफ्रिकेत झालेल्या सशस्त्र संघर्षांचा अभ्यास करण्यात आला. सशस्त्र बंडाळ्यांमुळे झालेली उपासमार, जखमा आणि रोगराई यामुळे सुमारे 50 लाख बालकांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले आहे. यापैकी सुमारे 30 लाख बालके ही एक वर्षापेक्षा कमी वयाची होती.

गेल्या 30 वर्षांत सर्वाधिक सशस्त्र बंडाळ्या या आफ्रिका खंडातच झालेल्या आहेत असे संशोधनात दिसून आले आहे. आजकालच्या सशस्त्र संघर्षांत केवळ लढवय्येच मारले जात नाहीत, तर त्यामुळे बालकांचे जीवनही धोक्‍यात येते. या काळात गर्भवती महिलांन आवश्‍यक सुविधा, औषधोपचार न मिळणे, स्वच्छ पाणी आणि अन्नाची कमतरता यामुळे बालकांचे कुपोषण होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. परिणामी मोठ्या संख्येने बालके मरण पावतात. असे या अहवालात म्ह्टले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)