आफ्रिकेच्या ‘मलावी’ आंब्याची पुणेकरांना भुरळ

पुणे – आफ्रिकेतून आलेल्या मलावी आंब्याने पुणेकरांना भुरळ घातली आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात पहिल्यांदाच आवक झालेला हा आंबा उत्तम दर्जाचा, गोड आणि टिकाऊ आहे. त्यामुळे शहरासह उपनगर, जिल्ह्यातून मोठी मागणी आहे.

कोकणच्या आंब्याचा नियमित हंगाम फेब्रुवारीपासून सुरू होणार असला, तरी या आंब्याची एकदिवसाआड नियमित आवक होत आहे. घाऊक बाजारात आंब्याला प्रतिडझनास 1 हजार 500 ते 1 हजार 800 रुपये भाव मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आफ्रिकेतील मलावीमध्ये कोकणसदृश्‍य हवामान असल्याने 2013 साली कोकणातून वाण नेवून हापूस आंब्याची लागवड करण्यात आली. याविषयी आंब्याचे व्यापारी नाथसाहेब खैरे म्हणाले, “मलावीमधील हवामान आंब्यांना पोषक ठरल्याने त्याठिकाणी लागवड झालेल्या कलमांना कोकणातील हापूससारखेच आंबे लागले आहेत. सध्यस्थितीत दर तीन दिवसांनी सरासरी 500 डझन आंबे हवाईमार्गाने मुंबईत दाखल होत आहे. सुरूवातीला आलेला हा आंबा कस्टमच्या कचाट्यात सापडल्याने एक आठवडा तिकडेच अडकला होता. मात्र, सर्व अटींची पूर्तता झाल्यावर तो सोडण्यात आला. आता, मात्र हा आंबा नियमितपणे मार्केटयार्डातील फळबाजारात येत आहे.’

राज्यभरात थंडीस सुरूवात झाली असून कोकणातही आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकणातील हंगामाचे हापूस आंबे बाजारात येण्यास अजून उशीर आहे. तोपर्यंत मलावी आंबा बाजारात उपलब्ध आहे. त्याचे भाव काहीसे चढे असल्याने त्याला उच्च वर्गाकडून विशेष मागणी असल्याचेही खैरे यांनी सांगितले.

कोकणातूनही हंगामपूर्व आंब्याची आवक
कोकणातून पावस आणि मिरे बांदर या भागातून अल्प प्रमाणात हंगामपूर्व आंब्याची आवक होत आहे. आठवड्याला 5 ते 6 डझनाच्या 3 ते 4 पेटी आंब्याची बाजारात आवक होत आहे. त्याच्या प्रतिपेटीस दर्जानुसार 8 ते 11 हजार रुपये भाव मिळत आहे. दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हंगामपुर्व हापूस आंबा बाजारात दाखल होतो. यंदा, ज्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात मोहोराचे रक्षण केले आहे. त्यांच्या बागेतून हा माल बाजारात विक्रीसाठी येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हापूसला चांगला भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी युवराज काची यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)