“आप’ महाराष्ट्रातून लोकसभेची एकही जागा लढवणार नाही

पाच राज्यांत लोकसभेच्या 33 जागा लढविणार

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या तयारीमध्ये आघाडी घेतली असून 2019च्या निवडणुकीत आम आदमी पक्ष फक्त 33 जागांवर लढविणार असल्याचे आम आदमी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आपकडून लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ याच जागांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. मात्र आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या या ५ राज्यांमधील ३३ जागांपैकी एकही जागा महाराष्ट्रातून लढवली जाणार नाहीये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2019 मधील पक्षाची प्राथमिकता निश्‍चित केली आहे. आपचे संयोजक गोपाल राय यांच्यानुसार, आम आदमी पक्ष दिल्ली (7), हरियाणा (10), पंजाब (13), गोवा (2) और चंडीगढ़(1) अशा 33 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. याच राज्यांवर पक्षाचे लक्ष केंद्रीत राहणार आहे.

महत्वाचे म्हणजे, केजरीवाल उद्या 4 जानेवारीपासून दिल्ली, गोवा, पंजाब आणि हरयाणातील नेत्यांशी चर्चा करायला सुरवात करणार आहेत. गोव्याशिवाय अन्य तिन्ही राज्यांतील नेत्यांशी चर्चेची वेळ ठरली आहे. या नेत्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या राज्यात प्रचारासाठी पाठविले जाईल. पक्षाचा जोर घरोघरी जावून प्रचार करण्यावर राहणार आहे. यानंतर केजरीवाल यांच्या सभा घेतल्या जातील.

पाच राज्यांतील 33 जागांवर लढणाया उमेदवारांची घोषणा सुध्दा 15 फेब्रुवारीपूर्वी केली जाणार आहे. आम आदमी पक्ष सध्या स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. मात्र, महाआघाडीत सामील झाल्यास रणनितीमध्ये थोडा बदल करण्याची पक्षाची तयारी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)