आप पक्षाने केले पंजाबमध्ये लोकसभेचे पाच उमेदवार जाहीर

चंदीगड: आम आदमी पक्षाने आपल्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून त्यांनी आज पंजाब मधील लोकसभेच्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहींरही केली आहे. पक्षाचे विद्यमान खासदार भगवंत मान यांना संगरूर मधून आणि साधु सिंग यांना फरीदकोट मधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शामचौरासी मतदार संघातून रावजोतसिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अमृतसर या महत्वाच्या मतदार संघात कुलदीपसिंग धालीवाल हे या पक्षाचे उमेदवार असतील. नरींदर सिंग शेरगील हे आनंदपुरसाहिब मतदार संघातील उमेदवार असतील. पंजाब मधील अन्य आठ उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील अशी माहितीही आम आदमी पक्षाच्यावतीने आज देण्यात आली. पंजाबात लोकसभेचे एकूण तेरा मतदार संघ आहेत आणि त्यातील चार जागा गेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने जिंकल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)