आप आमदारांची याचिका वरीष्ठ पीठाकडे वर्ग

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांनी आपल्या अपात्रतेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात केली होती त्यावर आज होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते पण उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने ही याचिका वरीष्ठ खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय आज जाहींर केला. ही याचिका आता उद्या दिल्ली उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधिशांकडे जाईल आणि ते ही याचिका कोणत्या पीठाकडे सोपवायची याचा निर्णय घेतील.

या आमदारांच्या याचिकेवरील निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने या आमदारांच्या मतदार संघात पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर करू नये असा आदेश उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत दिला होता. त्याची मुदत 29 जानेवारी पर्यंतच होती पण त्यांनी आता ही मुदतही वाढवली आहे. या आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या निर्णयाविषयीची सर्व कागदपत्रे न्यायालयाला सादर करण्याचा आदेशही निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. लाभाचे पद स्वीकारल्याच्या कारणावरून या 20 आमदारांना अपात्र ठरवण्यात आले असून निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राष्ट्रपतींनीही शिक्कामोर्तब केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)