आप्पासाहेब गिरमकर यांचा ग्रामसत्कार

देऊळगांव राजे- येथील आप्पासाहेब बाबासाहेब गिरमकर यांचा शासकीय सेवेतील यशस्वी 29 वर्षांच्या सेवा पूर्तीनिमित्त ग्रामथांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते ते जिल्हा उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, भूमी अभिलेख उपसंचालक शाम खामकर, विक्रिकर विभागाचे उपायुक्त संभाजी यादव, माजी पोलिस अधीक्षक दिलीप कदम, जि. प.सदस्य वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, भूमी अभिलेख उपसंचालक मिलिंद चव्हाण, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक विजय घनवट, कोपरगाव सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर आवारे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी, तर आभार लालासाहेब गिरमकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)