आपल्या मताचा अधिकार योग्य नेतृत्व निवडीसाठी करावा – मोनिका सिंह

वाघोली- लोकशाहीमध्ये नागरिकांना आपल्या मताच्या अधिकाराचा उपयोग योग्य नेतृत्व निवडीसाठी महत्त्वाचा असतो व मतदाराने निर्भयपणे याचा वापर करून लोकशाही अधिक सक्षम करावी, असे प्रतिपादन पुणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले. युवा संसद आणि मतदार जागृती अभियान या उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
जेएसपीएम इंपिरीयल अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि जिल्हा निवडणूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह,वाघोली संकुलाचे संचालक डॉ. विवेक कायंदे, प्राचार्य डॉ. दिलीप शाह, समन्वयक प्रा. संजय जगताप, डॉ. ग्लैडी पॉल, डॉ. सतीश तोडमल, तसेच सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. लोकशाहीत मतदान ही निरंतर प्रक्रिया असून निःपक्ष व निर्भयपणे मतदान करणे गरजेचे असून त्याचा वापर योग्य नेतृत्वाची निवड करण्यासाठी करावे, आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच सर्वांना मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे सांगून सिंह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यार्थांना देशाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात विकास घडविण्यासाठी आपल्यातील कौशल्य आणि कलागुणांना वाव देऊन चांगले नेतृत्व घडवावे, असे आवाहन केले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी “मी मतदान करणार’ अशी प्रतिज्ञा घेऊन लोकशाहीध्ये मतदान करण्याचा संकल्प केला. विद्यार्थी युवा संसदेत सत्ताधारी पक्षातून पंतप्रधानाच्या भूमिकेत प्रवीण औटी, विरोधी पक्ष नेता म्हणून विवेक चौधरी आणि सभापती म्हणून पृथ्वीराज शिंदे यांनी भाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)