आपल्या नावावरील पुस्तक अनाधिकृत – संजय दत्त

अभिनेता संजय दत्त यांनी केला खुलासा


प्रकाशक आणि लेखकावर ठोकणार दावा

नवी दिल्ली – अभिनेता संजय दत्त याचे आत्मकथन असल्याचे भासवत त्याच्यावरील एक नवीन पुस्तक बाजारात आले आहे. तथापी हे पुस्तक अनाधिकृत असून त्यासाठी पुस्तकाच्या लेखकाला किंवा प्रकाशकाला आपण अनुमती दिलेली नाही. तरीही त्यांनी हे पुस्तक बाजारात आणले असून त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत अशी माहिती स्वत: संजय दत्त याने आपल्या ट्विटर अकौंटवर दिली आहे.

यासेर उस्मान नावाच्या लेखकाने हे पुस्तक लिहीले असून ते जॉगरनॉट नावाच्या प्रकाशन संस्थेने बाजारात आणले आहे. त्या पुस्तकातील काही मजकुराच्या अनुषंगाने वृत्तपत्रांमधून बातम्याही प्रकाशित होऊ लागल्या आहेत. त्यानंतर संजय दत्त यांनी हा खुलासा केला असून त्यांनी या पुस्तकातील संदर्भावरून कोणत्याही बातम्या प्रसारीत करू नयेत असे आवाहन केले आहे. हे पुस्तक आपण आधी दिलेल्या काही मुलाखतींवर आणि काही ऐकीव बाबींवर तसेच जुन्या बातम्यांवर आधारीत आहे. ते आपले अत्मकथन नाही किंवा मी त्या पुस्तकाला अनुमतीही दिलेली नाही असे संजय दत्त याने म्हटले असून आपले स्वत:चे अधिकृत आत्मचरित्र लवकरच बाजारात येईल असेही त्याने म्हटले आहे.

संजय दत्त – द क्रेझी अन टोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवुड्‌स बॅड बॉय असे या पुस्तकाचे नाव आहे. संजय दत्त यांच्या कायदे सल्लागारांनी पुस्तकाच्या लेखकाला आणि प्रकाशकांना नोटीसाही पाठवल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)