आपल्या खेळाडूंना आधी भारताचा आदर करायला शिकवा – बीसीसीआयचा पाकला टोला

कोलकाता : कोलकातामध्ये आयसीसीची बैठक पार पडणार असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नजम सेठी यानिमित्ताने भारतात आले आहेत. भारत-पाकिस्तान मालिका न खेळण्यावरुन त्यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. बीसीसीआयला जर भारतीय संघाच्या पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान संघाच्या भारतामधील सुरक्षेसंबंधी चिंता आहे तर मग तिसऱ्या देशात मालिका का खेळवली जात नाही अशी विचारणा त्यांनी केली होती. बीसीसीआयला जर सरकारच्या परवानगीची इतकी काळजी होती तर मग २०१५ ते २०२३ पर्यंत आठ वर्षांत पाच मालिका खेळवण्याचा करार कशासाठी केला होता असंही त्यांनी विचारलं. दरम्यान नजम सेठी यांच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना आधी भारताचा आदर करायला शिकवा असा टोला मारत सुनावले आहे.

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली याचा वाघा बॉर्डरवरील व्हिडीओचाही बीसीसीआयने उल्लेख केला आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या देशाचा साधा आदर न करु शकणाऱ्या देशासोबत खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकारी परवानगीचा प्रश्न तर बाजूलाच राहिला. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली ज्याप्रकारे वाघा बॉर्डरवर वागला आहे, सोबतच शाहिद आफ्रिदीने काश्मीर मुद्द्यावर जे ट्विट केले यावरुनच भारतीय बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होत आहे. पाकिस्तानच राजकारण आणि खेळाला एकत्र करत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)