आपला हक्क लढून मिळवूच आत्महत्या करू नका

चिंबळी- मराठ्यांचे रक्‍त हे रंगगणात लढून मरणारे आहे.आत्महत्या हा दुबळा पर्याय आहे. आपला हक्क आपण लढून मिळवूच आत्महत्या करू नका, तुम्ही उद्याचा उज्वल समाज आहात, असे आवाहन छत्रपतींचे श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार यांच्या तेराव्या वंशज मॉंसाहेब अंजलीराजे अजितसिंह दाभाडे सरकार यांनी “प्रभात’शी बोलताना केले.
चिंबळी (ता. खेड) येथील प्रगतशील शेतकरी, उद्योजक संजय जैद पाटील यांच्या परिवाराला आज (रविवारी) दाभाडे सरकार कुटुंबीयाने सदिच्छा भेट दिली, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांच्या सोबत वहिनीसाहेब संध्याराजे धवलराजे दाभाडे सरकार उपस्थित होत्या. यावेळी जैद पाटील कुटुंबीयांची भेट घेत त्यांनी दोन्ही परिवारातील स्नेह वृंद्धिगत केला. यावेळी उद्योजक संजय जैद पाटील, जैद पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनुराग जैद पाटील, कुरुळीचे माजी उपसरपंच अमित मुऱ्हे, राजश्री जैद पाटील, स्वाती जैद पाटील, अभिषेक जैद पाटील उपस्थित होते. अंजलीराजे दाभाडे सरकार म्हाणाल्या की, समाजातील तरुण लढण्या ऐवजी आत्महत्या करीत मागणी मान्य करण्याचा अट्टहास धरत आहे. याबाबत अनेक घटना कानावर आल्याने आपण व्यथित होत असल्याचे सरकार यांनी सांगितले.

What is your reaction?
4 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)