सातारा: आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वांनी सज्ज रहावे

हलगर्जी करणाऱ्यांवर कडक करवाई:जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

सातारा – जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज रहावे, कुणी हलगर्जी केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज दिला.
नैसर्गिक आपत्ती बाबत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज येथील नियोजन भवनामध्ये घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.

पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्‍यता असते अशा ठिकाणची पहाणी करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनेचा आराखडा तयार करुन सर्वप्रथम आपले नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. ग्रामीण भागातील गावांमध्ये पूर परिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी गावातील युवकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष घालावे. गावातील चांगले पोहणाऱ्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक संकलीत करुन गावातील भिंतींवर रंगवून घ्यावे. प्रदर्शीत करावेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे तसेच धोकादायक पुलांची पाहणी करुन तसा अहवाल सादर करावा. पावसाळ्यात दूषीत पाण्याचा पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसरची नियुक्ती करुन त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी. अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच अन्य यंत्रणांना द्यावीत, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील नालासफाई, गटारी यांची साफसफाई करुन घ्यावी. आरोग्य विभागाने आवश्‍यक तो औषध साठा, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज ठेवावी त्याचबरोबर वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील ओढे स्वच्छ करावीत. ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनची गळती काढावी. ग्रामसेवकांनी पावसाळ्यात पाण्याचे नमुने तपासूनच पाणी पुरवठा करावा. आरोग्य विभागाने पुरेशा औषध उपलब्ध करुन घ्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील धोकादायक पुलांची पाहणी करुन उपाययोजना कराव्यात. गट विकास अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रत्येक गावात कार्यशाळा घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

ग्रामीण भागातील ज्या पुलांवरुन पाणी वाहते अशा पुलांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावी. त्या ठिकाणी होमगार्डची नेमणुक करण्यात येईल. ग्राम रक्षक दल व हरीत सेनेमध्ये नोंदणी केलेल्या तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण द्यावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी मागेल ती मदत पुरविली जाईल, असे आश्वासनही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यावेळी दिले.

या बैठकीनंतर 13 कोटी वृक्ष लागवड, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार अभियान योजनेचाही विभाग निहाय आढावा घेण्यात आला.
या बैठकीस सर्व प्रांताधिकारी सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)