आपत्कालीन जीवरक्षक जनसंपर्क कार्यालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर – डिझास्टर्ड रेस्क्यू लाईफगार्ड सोसायटीच्या आपत्कालीन जीवरक्षक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.येथील जीवबा-नाना पार्क परिसरातील जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या घरी त्यांच्याच पुढाकाराने आपत्कालीन जीवरक्षक जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या आपत्कालीन सेवेमुळे आपत्कालीन परिस्थितीत शहरवासीयांना बचाव आणि मदत कार्याची तात्काळ सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या नवीन घराची पालकमंत्र्यांनी पाहणी करुन कांबळे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी अंजली पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच श्री. उत्तमराव कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, संदीप देसाई, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोल्हापूर समन्वयक विजय जाधव, माजी नगरसेवक श्री. रामुगडे, पणन विभागाचे विशेष लेखा परिक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे उपस्थित होते.प्रारंभी जीवरक्षक दिनकर कांबळे‍ यांनी पालकमंत्र्यांसह अन्य मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी जीवरक्षक दिनकर कांबळे यांचे सर्व कुटुंबिय, नातेवाईक तसेच नागरिक उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)