आपणास हे माहीत आहे का ?

प्रवासी गाड्यांच्या विक्रीत मारुती कंपनीने मोठा वाटा मिळविला असून एप्रिल ते जून या तीन महिन्यात या कंपनीने ४ लाख ५८ हजार ९६७ गाड्यांची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या याच तीन महिन्यांतील विक्रीपेक्षा २४.९३ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी या काळात मारुतीने ३ लाख ६७ हजार ३८६ गाड्यांची विक्री केली होती.

भारतातील सर्वाधिक मौल्यवान ब्रँड ‘टाटा’ कंपनी असून त्याची किंमत सध्या १४.२ अब्ज डॉलर इतकी आहे. २०१८ मध्ये त्याच्या मूल्यात ९ टक्के वाढ झाली आहे. टाटानंतर एअरटेल, इन्फोसिस, एलआयसी  आणि एचसीएल या कंपन्याचा नंबर लागतो.

इन्फोसिसचे एक संस्थापक आणि माजी सीईओ एस. डी. शिबुलाल यांच्या कुटुंबीयांनी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात इन्फोसिसचे १६ लाख शेअर्स विकले आहेत. कंपनीच्या पेड अप भांडवलाच्या तुलनेत हे शेअर्स ०.०७४ टक्के होते. पण त्यांची किंमत होते अंदाजे १४ हजार कोटी रुपये !

– जपानची सॉफ्ट बँक भारतातील चांगल्या उद्योगांना कर्ज देते आणि प्रचंड नफा कमवते. तिने फ्लिपकार्ट कंपनीलाही सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. अमेरिकेची वॉलमार्ट कंपनीने अलीकडेच फ्लिपकार्ट कंपनी विकत घेतली, त्यावेळी सॉफ्ट बँकने आपले शेअर विकले आणि दोन वर्षात त्यातून तब्बल ६० टक्के नफा मिळविला.

‘ट्रेन १८’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या रेल्वेची चाचणी या सप्टेंबरमध्ये होत असून या प्रकारच्या गाड्या प्रतितास १६० किलोमीटर या वेगाने धावणार आहेत. Research Design and Standards Organization (RDSO) या  संस्थेने चाचणीत या रेल्वेला पास केल्यानंतर ती वापरात येईल. चेन्नईच्या इंट्रीगल कोच फॅक्ट्ररीमध्ये मेक इन इंडियाअंतर्गत या रेल्वेची निर्मिती होत असून ती इलेक्ट्रिकवर चालेल तसेच ती मेट्रोप्रमाणे असेल म्हणजे तिला स्वतंत्र इंजिन नसेल. सुरूवातीस अशा सहा गाड्या तयार होत असून त्यातील दोन स्लीपर कोच असतील. सध्याच्या काही शताब्दी गाड्यांची जागा त्या घेतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)