आपटीत ऊसतोड कामगाराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

शिक्रापूर-आपटी (ता. शिरूर) गावासह परिसरातील वढू बुद्रुक, वाजेवाडी, पिंपळे जगताप या भागामध्ये नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत होते, तर आता आज सकाळी येथील एका शेतामध्ये ऊस तोड करणाऱ्या मजुरांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये एक युवक जखमी झाला असून येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
बबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये सुनील नवलसिंग फुलपगारे (रा. धुळे जि. धुळे) हा सोळा वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याच्या खांद्यावर व पाठीवर बिबट्याच्या पायांचे निशाण उमटले असून तो जखमी झाला आहे. आपटी येथील पंडित श्रीपती ढगे यांच्या शेतामध्ये आज सकाळपासून काही ऊसतोड कामगार ऊस तोडणीचे काम करत होते, तर यावेळी ऊसतोड कामगारांची मुले शेताच्या कडेला खेळत होती, त्यावेळी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक उसाच्या शेतातून बाहेर येत एका बिबट्याने ऊसतोड कामगारांच्या सुनील या सोळा वर्षीय सुवकावर हल्ला चढविला. सुनीलने आरडाओरडा केल्यामुळे इतर ऊसतोड कामगारांनी बिबट्याला प्रतिकार केला. बिबट्या पळून गेला असल्याची घटना घडली. येथील नागरिकांच्या मदतीने सुजीलला वढू बुद्रुक येथील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांनतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वनरक्षक सोनल राठोड, वनमजूर आनंदराव हरगुडे यांनी घटनास्थळी भेट देत जखमीची विचारपूस करत पंचनामा केला असून येथे तातडीने पिंजरा लावणार असल्याचे सांगितले.

  • ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला त्या ठिकाणची पाहणी आम्ही केली असून तेथे कोठे बिबट्या आढळून आला नाही; परंतु बिबट्याला पकडण्यासाठी आम्ही तातडीने पिंजरा लावणार आहोत.
    -सोनल राठोड, वनरक्षक

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)