“आप’च्या 27 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी राष्ट्रपतींनी फेटाळली 

लाभाचे पद भूषवण्याचे प्रकरण 

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना लाभाच्या पदावरच्या नियुक्‍तीप्रकरणी अपात्र ठरवण्याचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला असल्याचे समजते आहे. दिल्लीतल्या स्थानिक रुग्णालयांशी संबंधित रोगी कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून या आमदारांची नियुक्‍ती करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रपतींनी जुलै महिन्यात निवडणूक आयोगाकडून मत मागवले होते. त्या मताच्या आधारावर राष्ट्रपतींनी या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या अर्जाला फेटाळले आहे, असे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्ली सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने 26 एप्रिल रोजी रोगी कल्याण समित्या स्थापन केल्या आहेत. आरोग्य सुविधा, विकास आणि आरोग्याशी संबंधित सुधारणा करण्यासाठी सल्ला देण्याचे काम या समित्या करतात. आरोग्यसेवेच्या मदतकार्यासाठी या प्रत्येक “रोगी कल्याण समिती’ला दरवर्षी 3 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे.

या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीमध्ये निवडणूक आयोगाला कोणतेही तथ्य आढळले नाही. अशा स्वरुपाची मागणी करणारे अर्ज राष्ट्रपतींकडे सातत्याने येत असतात आणि राष्ट्रपतींकडून ते अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवले जातात. निवडणूक आयोगाच्या मताच्या आधारे राष्ट्रपती या मुद्दयांवरील निर्णय घेत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)