‘आप’च्या २० आमदारांचे सदस्यत्व कायम

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना लाभाचे पद स्वीकारल्यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. परंतु, आता ‘आप’ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.  कारण, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द करत न्यायालयाने या २० आमदारांचं सदस्यत्व कायम ठेवले आहे. तसेच या प्रकरणावर पुन्हा एकदा सुनावणी करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला दिले आहेत.

दिल्ली उच्चन्यायालयाच्या या निर्णयानंतर ‘सत्याचा विजय झाला,’ असे टि्वट आपचे संयोजक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना आणि चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणावर २८ फेब्रुवारी रोजी निलंबित आमदार आणि निवडणूक आयोगाने युक्तिवाद केला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला होता. त्यावर न्यायालायाने आज निर्णय दिल्याने आपच्या आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘सत्याचा विजय झाला आहे. दिल्लीच्या लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आले  होते. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीकरांना न्याय दिला आहे. हा दिल्लीकरांचा मोठा विजय आहे. दिल्लीकरांचे अभिनंदन!,’ असे टि्वट केजरीवाल यांनी केले  आहे. दरम्यान, या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. निर्णयाचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)